Chandrashekhar Bawankule | ‘संताजी आणि धनाजी सारखे 18-18 तास काम करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

0
203
Chandrashekhar Bawankule | santaji and dhanaji sarekh two sardars 18 hours of administration chandrashekhar bawankule
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | राज्यात शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना कोणाची हा वाद सुरु असून कायदेशीर लढाईत तो वाद अडकला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षप्रमुख (Party Chief) पदाची मुदत संपत आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shiv Sena Thackeray Group) अनिल परब (Anil Parab) यांनी निवडणूक आयोगाचा काहीही निकाल लागला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहतील असे सांगितले. यावर भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे.

ADV

 

उद्धव ठाकरे यांचा सोमवारी (दि.23) पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. पाचवर्षापूर्वी पक्षाच्या कार्यकारणीत त्यांची पक्षप्रमुखपदी निवड केली होती. त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या पक्षांतर्गत निवडणुका घेणे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यातच ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच संताजी आणि धनाजी हे 18-18 तास काम करत असल्याचे त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सरकारने साधा पेनही चालवला नाही.
त्यांच्या खिशातही पेन नव्हता आणि आमदारांच्या पत्रावर 18-18 महिने सह्या व्हायच्या नाहीत. 18-18 महिने मुख्यमंत्री मंत्रालयात यायचे नाहीत.
जेव्हा तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही. आता कितीही शक्तीप्रदर्शन करा, इकडे संताजी आणि धनाजी सारखे दोन सरदार आहेत.
हे दोन सरदार 18-18 तास महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी काम करत आहेत.
त्यामुळे कितीही शक्ती प्रदर्शन केलं आणि कितीही उड्या मारल्या तरी काही होणार नाही,
अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाला फटकारलं आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | santaji and dhanaji sarekh two sardars 18 hours of administration chandrashekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान