मोहरमनिमित्त मंगळवारी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोहरम सणानिमित्त शहरातील विविध मार्गावर ताबूत, पंजे, छबिले यांच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात येतात. या मिरवणुका वेगवेगळ्या वेळेत निघत असल्याने मंगळवारी (दि.१०) शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बदल करण्यात आलेल्या मार्गावर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

मुख्य मिरवणूक दुपारी दोन वाजता निघणार असून या मिरवणूकीतील मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्ग – पर्वती गाव बँक ऑफ महाराष्ट्र पटेल हाऊस येथून सुरुवात होणार आहे. हि मिरवणूक निलायम ब्रीज यु टर्न करुन पर्वती पुल डावीकडे वळून सावरकर चौक डावीकडे वळून जमनालाल बजाज चौक, उजवीकडे वळून नेहरु स्टेडीयम मार्गे जेधे चौक, डावीकडे वळून उलटे शिवाजी रोडने राष्ट्रभुषण चौक ते फडगेट चौकी, उजवीकडे वळून बारा ईमाम दर्गा, पानघंटी चौक, मिठगंज पोलीस चौकी, जुनी रामोशी गेट पोलीस चौकी, डावीकडे संत कबीर चौक, पावर हाऊस चौकातुन नरतगिरी चौक, मालधक्का चौक, डावीकडे वळून शाहीर अमर शेख चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक, यु टर्न करुन पुन्हा शाहीर अमर शेख चौक आरटीओ चौक संगम ब्रीज येथे विसर्जन.

लष्कर मिरवणूक मार्ग
लष्कर भागातील ताबूत, पंजे ताबूत स्ट्रीट येथे एकत्र येतात. तेथून दुपारी बारा वाजता मिरवणूकीला सुरवात होते. ही मिरवणूक बागीचा सरबतवाला चौक – बबाजान दर्गा – भोपळे चौक – गाव कसाब मशिद – डावीकडे वळून एम.जी. रोडने कोहीनूर चौक, भगवान महावीर चौक, नाझ हॉटेल चौक, डावीकडे वळून बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बागीचा चौक या ठिकाणी दोन वाजता येऊन धार्मीक विधी पार पडेल. नंतर तेथून पुढे नेहरु मेमोरीयल हॉल, रहिम पेट्रोल पंप, जूना समर्थ पोलीस स्टशन मार्गे डावीकडे वळून पावर हाऊस चौकातून उडवीकडे वळून नरतगिरी चौक मालधक्का चौकातू डावीकडे वळुन शाहीर अमर शेख चौकातून डावीकडे वळुन कुंभार वेस चौकातून यु टर्न करुन पुन्हा शाहीर अमर शेख चौक आरटीओ चौक संगम ब्रीज येथे विसर्जन.

खडकी भागातून निघणारी मिरवणूक
आसुडखाना चौक, नवीन तालीम चौक, स्टार हॉटेल चौक, महाराष्ट्र बँक चौक, डी आर गांधी चौक, टिकाराम चौक, सराफ बाजार मार्गे खडकी रेल्वे स्टेशन, मुंबई पुणे रोडने बोपोडी वि.भा. पाटील पुलावरुन नदीमध्ये विसर्जन.

इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक
इमामवाडा लष्कर ते रहिम पेट्रोलपंप, नेहरु मेमोरीयल चौक, डावीकडे वळून पोलीस आयुक्त कार्यालयासमोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधु वासवानी चौक, १३ कॅनॉट रोड, आगाखान कंपाऊंड या ठिकाणी धार्मीक कार्यक्रम होऊन ही मिरवणूक परत उलट मार्गे इमामवाडा येथे विसर्जीत होईल. मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार काही वेळा करीता बंद अथवा वळविण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पुर्ववत करण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी वरील नमूद मार्गावर येण्याचे टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –