जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे निलामय ब्रीज वरील वाहतूकीत बदल

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्य़ंत २२०० मी.मी. व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्याचे काम सोमवार (दि.२५) पासून सुरु होत आहे. या कामामुळे निलायम ब्रीजवरील वाहतून वळवण्यात आली असून हे काम पंधरा दिवस चालणार आहे. यामुळे नीलायम ब्रीजवरील वाहतूक पंधरा दिवसांसाठी (२५ जुन ते ९ जुलै) बंद करण्यात आली असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे यांनी केली आहे.

जनता वसाहत व गजानन महाराज चौकाकडून निलायम ब्रीज मार्गे ना.सी. फडके चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी गजानन महाराज-शिवदर्शन चौक- मित्रमंडळ चौक – सावरकर चौक या मार्गाचा वापर करावा.

ना.सी. फडके चौकाकडून निलायम ब्रीज कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी ना.सी. फडके चौकातून सरळ पर्वती ओव्हर ब्रीज खालुन डावीकडे सावरकर चौक – मित्रमंडळ सर्कल – वर्धमान चौक – गजानन महाराज चौक या मार्गाचा वापर करावा. किंवा ना.सी. फडके चौकातुन सरळ पर्वती ओव्हर ब्रीज खालुन सावरकर चौक  मित्रमंडळ मार्गे – शिवदर्शन चौक – गजानन महाराज चौक या मार्गाचा वापर करावा.

नागरिकांनी वरील रोडवरील वाहतुक बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.