Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धर्मादाय कार्यालयाकडील (Charity Pune Division) प्रलंबित वाद नसलेले बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) (Change Report) आणि स्थावर मिळकत (Real Estate) बदल अर्ज निकाली काढून पुणे विभाग राज्यात पुन्हा एकदा अव्वल (Charity Pune Division Tops Once Again In Maharashtra) आहे. पुणे धर्मादाय विभागाने (Charity Pune Division) तब्बल 2 हजार प्रकरणे निकाली काढत अव्वल स्थान मिळवले आहे.

 

धर्मादाय विभागाचे आयुक्त प्रमोद तरारे (Charity Commissioner Pramod Tarare) यांच्या सुचनेनुसार 14 मार्च ते 25 मार्च या कालावधीत प्रलंबित नसलेले बदल अर्ज, स्थावर मिळकत बदल अर्ज आणि कलम 50 अन्वये योजना अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम (Special Campaign) राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार धर्मादाय कार्यालयाने या मोहिमेमध्ये पुणे विभागातील 6 हजार 450 प्रकरणांपैकी 2 हजार 38 प्रकरणे निकाली काढली.

 

पुणे विभागामध्ये पुणे, नगर (Nagar), सातारा (Satara) आणि सोलापूर (Solapur) या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.
विनावाद बदल अहवालांची ‘झिरो पेंडन्सी’ (Zero Pendency) व्हावी यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
या मोहिमेत धर्मादाय कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय वकील पक्षकारांचे सहकार्य मिळाले. या सगळ्यांच्या योगदानामुळे पुणे विभाग राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे,
असे धर्मादाय सहआयुक्त सुधीर कुमार बुक्के (Charity Joint Commissioner Sudhir Kumar Bukke) यांनी सांगितले.

 

Web Title :- Charity Pune Division | charity pune division tops once again in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

 

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

 

Punit Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे 7 एप्रिलपासून आयोजन; पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या 18 संघांचा समावेश !

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा