Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव शिवनेरीवर साजरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी पोलीस दलाने देखील आपल्या राजाला सलामी दिली.

छत्रपती शिवरायांची ३९४वी जयंती संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र मंगलमय असे वातावरण आहे.
तर किल्ले शिवनेरीवर उत्सवाचे स्वरूप आले आहे.

बाल शिवरायांच्या आगमनानिमित्त शिवनेरीवरच्या पाळणाघरात महिलांनी पाळणागीत गायले.
पाळणागीताचे स्वर, घोषणा आणि किल्ल्यावर केलेल्या अप्रतिम सजावटीने वातावरण शिवमय झाले होते.

जन्मोत्सवनिमित्त गडावर शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे. आज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक, आरोपीवर MPID

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त