पुण्यातील रास्त भाव धान्य दुकानांचे होणार सर्वेक्षण

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या आदेशान्वये ज्या तालुक्यांमध्ये ऑगस्ट 2018 या महिन्यात वाटप झालेल्या धान्यापैकी 25 टक्कयांपेक्षा जास्त धान्य इ पॉस मशिनशिवाय देण्यात आलेले आहे त्या दुकानांचे सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण दिनांक 18 व 19 सप्टेंबर 2018 या कालावधीत होणार आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb1986cd-ba89-11e8-97bc-99d62ebc05e7′]

या मोहिमेमध्ये पुणे जिल्हयातील भोर, हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरुर व वेल्हे या 8 तालुक्यातील प्रत्येकी 20 दुकानदारांची (एकूण 160 रास्त भाव दुकाने) निवड ऑनलाईन उपलब्ध डाटानुसार करण्‍यात आलेली आहे. या दुकानदारांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या कार्डधारकांना बोलावून त्यांच्याकडून सखोल माहिती घेवून तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्‍यामार्फत करण्यात येणार असून तपासणीची कार्यवाही अत्यंत काटेकोरपणे होणार आहे. या निवडलेल्या 160 रास्तभाव दुकानदारांपैकी काही रास्तभाव दुकानांना शासनस्तवरावरील पथक भेट देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

नगररचना विभागाने सुचविलेले बदल पीएमआरडीएला बंधनकाराक नाहीत : पीएमआरडीए आयु्क्त