खुशखबर ! मोबाईल धारकांसाठी नेटफ्लिक्सचा ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन, एवढी कमी होणार किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स भारतीत आपल्या युजर्ससाठी एक गिफ्ट आणत आहे. यात ते आपल्या युजर्सला आधी पेक्षा स्वस्त प्लॅन देणार आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, फक्त मोबाइल युजर्ससाठी हा प्लॅन असणार आहे आणि येणे ग्राहकांची संख्या वाढण्यात मदत होईल. इतर व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपन्या प्राइम व्हिडिओ आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत नेटफ्लिक्स हा प्लॅन आणत आहे.

नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले की, अनेक महिन्यांच्या परिक्षणानंतर कंपनीने निर्णय घेतला आहे की, भारतात फक्त मोबाईल युजर्ससाठी स्वस्त प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. जो सध्याच्या प्लॅनच्या भाग आहे. कंपनीने सांगितले की आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, आम्ही लवकरच हा प्लॅन लॉन्च करणार आहे.कंपनीचे म्हणणे आहे की या प्लॅनमुळे भारतातील युजर्सला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हा प्लॅन भारतात उद्योग वाढवण्यासाठी बरीच मदत करेल.

नेटफ्लिक्सने घेतलेल्या या निर्णयानंतर नेटफ्लिक्स ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे भारतातील नेटफ्लिक्सचे चाहते असलेल्यांना ही मोठी आणि विशेष ऑफर असणार आहे.

२५० रुपये प्लॅन –

कंपनीने सांगितले की, भारतातील त्यांचा हा प्लॅन २५० रुपये दरमाह मोबाइलसाठी असणार आहे. कंपनी सध्या ५०० रुपये दरमाह आपली सेवा देत आहे. सध्या कंपनीचे १९० देशात एकूण १५ कोटी यूजर्स आहेत. असे असेल तरी विविध देशात विविध डेटा उपलब्ध करण्याता आलेला नाही. भारतात इंटरनेट डाटा स्वस्त झाल्यानंतर ऑनलाइन कंटेट देखील आधिक पहायला जात आहे.