Cheating Fraud Case Pune | पुणे : डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठ नागरिकाला 20 लाखांना गंडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pune | डेटिंग साइटवर (Dating Sites) ओळख झालेल्या महिलेने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 20 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 9 जानेवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत त्रिमुर्ती कोर्ट (Trimurti Court) कोरेगाव पार्क येथे घडला आहे. याबाबत राहुल रोसा (वय-55 रा. त्रिमूर्ती कोर्ट, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नेहा शर्मा हिच्यासोबत एका डेटिंग साइटवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये रोज संवाद सुरु झाला. एकदा नेहा हिने फिर्यादींना गुंतवणुकीबद्दल माहिती देऊन कॅपिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी सुरुवातीला 50 हजार गुंतवले. त्याचा नफा दिसून येत होता म्हणून नेहाने वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडून फिर्यादी कडून एकूण 20 लाख 53 हजार रुपये उकळले. (Cheating Fraud Case Pune)

त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काढता येत नव्हते म्हणून नेहा हिला विचारणा केली.
त्यावेळी तिने आणखी पैसे भरण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी आयटी अॅक्ट सह (IT Act) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते (PI Ashwini Satpute) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात