Chehre | अमिताभ बच्चन यांनी सांगितली नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, आता ‘या’ तारखेला चित्रपटगृहांमध्ये उडणार धमाल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chehre | अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) याच्या चेहरे (Chehre) चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत होते. अगोदर हा चित्रपट एप्रिलमध्ये पदर्शित (release) होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता या चित्रपटाची पदर्शनाची नवीन तारीख समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही खुशखबर दिली.

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, जर तुमच्यापैकी कुणी एखादा गुन्हा केला असेल तर येथून सांभाळून जा. कारण हा खेळ तुमच्या सोबत सुद्धा खेळला जाऊ शकतो.

प्रदर्शनाची तारीख आली समोर

अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे की – सावधान. तुम्हाला इशारा दिला जात आहे. या गेमला तोंड देण्यासाठी तयार रहा. कारण हा आरोप तुमच्यावर सुद्धा लावला जाऊ शकतो. ‘चेहरे’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये 27 ऑगस्ट (27 Augast) ला प्रदर्शित होत आहे.
या व्हिडिओला 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

काय म्हणाले निर्माते…

चेहरेचे निर्माते आनंद पंडित (producer Anand Pandit) यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत म्हटले आहे की, माझ्या डोक्यात काहीही शंका नाही की हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.
चेहरे मोठ्या पडद्यावर एक वेगळा ठसा उमटवणार आहे.
मी चित्रपटगृहांमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट पहात मोठा झालो आहे आणि मिस्टर बच्चन यांना मोठ्या पडद्यावर आणणे माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी शानदार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी (director Rumi Jaffrey) यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. चेहरेचा ट्रेलर यापूर्वी प्रदर्शित झाला आहे.

Web Title : Chehre | amitabh bachchan emraan hashmi starrer chehre gets new release date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक