Chhagan Bhujbal | शरद पवारांना जाणता राजा म्हणणारच, छगन भुजबळांचे विरोधकांना प्रत्युत्तर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) आक्रमक झाला आहे. भाजपने अनेक ठिकाणी आंदोलनं करुन अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याच दरम्यान राष्ट्रावादीचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जाणता राजा (Janata Raja) का म्हणू नये? असा सवाल करत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

म्हणून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे

अजित पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, अजित पवार यांनी संभाजी महाराज यांचा अपमान केला नाही. त्यांचे विधान चुकीचं असत तर भाजपने सभागृहात आक्षेप घ्यायला हवा होता. परंतु तसं झालं नाही. काही दिवांपूर्वी राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. यावरुन लक्ष हटवण्यासाठी अजित पवार यांना टार्गेट केले जात असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच संभाजी राजांनी स्वराज्याचे रक्षण केले म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक (Swarajrakshak) म्हटले जाते. परंतु कोणाला धर्मवीर (Dharmaveer) म्हणायचे असेल तर ते म्हणू शकतात, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

शरद पवारांना जाणता राजा म्हणण्याला समर्थन

शरद पवार यांना जाणता राजा म्हटल्याने शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान होतो, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन आहे. कारण जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वीच्या भाषेत जाणता राजा म्हटले जायचे. शरद पवार यांनी सरकारच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, पुणे, नाशिक, मुंबईत अनेक उद्योग आणले आहेत. त्यांनी शिक्षण, सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्यामुळे महिलांना आरक्षण (Reservation for women) मिळाले आहे. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणतात. जनतेच्या समस्यांशी एकरुप होऊन जो प्रश्न मार्गी लावतो, तो जाणता राजा असतो, असे सडेतोड प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी विरोधकांच्या आरोपांना दिले.

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal statement on calling janta raja to sharad pawar in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गटबाजीचा पक्षाला फटका, कार्यकर्त्यांनी केली थेट शरद पवारांकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’

Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर