धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीचे ‘हे’ मोठे नेते रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काल रात्री राष्ट्रवादी नेते धंनजय मुंडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर आता छगन भुजबळ यांना देखील दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची धावपळ झाली होती. त्यामुळे भुजबळांना त्याचा ताण आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धंनजय मुंडे देखील रुग्णालयात
काल रात्री धनंजय मुंडे याना देखील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील समर्थकांनी केले आहे.

 

Visit : Policenama.com