Chhagan Bhujbal | महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण ! 5 वर्ष पूर्ण करण्यास सरकार खंबीर; छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे (Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad) संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले समता परिषदेचा ‘समता पुरस्कार’ (Samta Puraskar) वितरण सोहळा पार पडला. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, ‘सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने में’ अशा शेरोशायरीने भुजबळांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) 2 वर्ष पूर्ण झाली. काही लोकांना ते पचत नाहीये. आज किंवा उद्या सरकार पडण्याची भाषा विरोधक करत आहेत. पण हे सरकार शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सोनिया गांधींचं (Sonia Gandhi) सरकार आहे. हे सरकार खंबीर आहे. त्यामुळे 5 वर्ष पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

 

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची 131 वी पुण्यतिथी व समता दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal)
यांच्या हस्ते छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री (Chhattisgarh CM) भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले.

 

महात्मा हे सर्व सन्मानांपेक्षा वरचं पद आहे. त्यामुळे फुलेंना भारतरत्न मिळवा असं बोलणाऱ्यांना त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाड्यात जायला जागा नाही. ही जागा वाढवण्यावर भर दिला जाईल.
सावित्रीबाई फुले सभागृह (Savitribai Phule Hall) आणि महात्मा फुले वाडा (Mahatma Phule Wada) यांना जोडणारा रस्ता आपण बनवणार असल्याचं त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच निशाण्यावर धरलं. आरक्षण (Reservation) मिळवल्याशिवाय शांत रहायच नाही.
सर्वांनी एकत्र या. ओबीसी जनगणना (OBC Census) झालीच पाहिजे. गायींची, म्हशींची संख्या मोजतात, आम्हाला मोजा.
आम्ही 54 टक्के आहोत आणि तुम्ही 27 टक्केच बघता. असे अनेक शाब्दीक वार त्यांनी केंद्र सरकारवर (central government) केले.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal), कमल ढोले पाटील, दीप्ती चवधरी, माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap),
वैशाली बनकर, जेष्ठ अभ्यासक हरी नारके, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar),
समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी घाडगे, प्रीतेश गवळी, आमदार सिद्धार्थ कुशावाह, सुनील सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title : Chhagan Bhujbal | Mahavikas Aghadi completes two years! Government determined to complete 5 years; Statement of Chhagan Bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | दोन वर्षात फक्त फसवणूक केली, लोकांचे पैसे लुटले; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारला सणसणीत टोला

Urfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस, काळा तिळावर पडल्या सर्वांच्या नजरा अन्…

Uddhav Thackeray | महाराष्ट्रामध्ये पुन्हा Lockdown लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला स्पष्ट इशारा