Uddhav Thackeray | महाराष्ट्रामध्ये पुन्हा Lockdown लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला स्पष्ट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन राज्यातील कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) धोका आता संपला असे वाटत असतानाच नव्या व्हेरिएंटमुळे (New Variant) राज्यासमोरील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची बैठक होत असून कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधने (Health restrictions) पाळावीच लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

 

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा.
केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
याशिवाय मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता.
पण, आता लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारने (Central Government) दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) इतर देशातून येणाऱ्या
प्रवाशी विमानांची वाहतूक थांबवावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.
विमानतळांवर (Airport) येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

 

राज्याची नवी नियमावली

 

राज्य सरकारची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.
जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे. शनिवारी (दि.27) जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वात (guiding principle) संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता,
कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तवणूकविषयक नियम आणि दंड याबाबत सविस्तर माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

 

Web Title : Uddhav Thackeray | will there be another lockdown in maharashtra chief minister uddhav thackery gave warning know more in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Urfi Javed | उर्फी जावेदनं परिधान केला खुपच बोल्ड ड्रेस, काळा तिळावर पडल्या सर्वांच्या नजरा अन्…

Mahavikas Aghadi Government | भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी न होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Mumbai-Pune Highway | पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय ! जुना मुंबई-पुणे, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत बंद