Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Chhatrapati Sambhaji Nagar Accident | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. तर अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी सहाच्या सुमारास सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील (Sillod to Pachora Highway) वांगी फाट्याजवळ झाला आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सहाच्या सुमारास वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात एवढा भिषण होता की एसटीचा समोरील भागाचा अक्षरश:चुराडा झाला आहे. अपघातानंतर टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर सांडले होते. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच रस्त्याने जाणारे वाहनधारक देखील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले.
नागरिकांनी एसटीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
जखमींवर उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
तसेच या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना मदत करुन मार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

 

Web Title :- Chhatrapati Sambhaji Nagar Accident | chhatrapati sambhaji nagar bus accident one dead many inured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”