Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन तरुणाचा पाठलाग करुन तरुण ज्या घरात शिरला त्या घराच्या दरवाजावर कोयते मारून आणि खिडकीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) बुधवारी (दि.1) पिंपरी येथील बौद्धनगर येथे रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

याबाबत विशाल लक्ष्मण बनसोडे (वय-19 रा. बौद्धनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमन शेख, करण टाक, आशिष पाल, सागर धावारे, अभिजीत गायकवाड, सागर उर्फ एस टी (सर्व रा. बैद्धनगर व पत्रा शेड) आणि त्यांचे इतर तीन अनोळखी तरुणांवर आयपीसी 143,147,148,149,427,504,506 तसेच आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रात्री बाथरुमला जाण्यासाठी घराबाहेर आले
असता त्याचा मित्र अभिमान पोपट भालेराव हा धावत आला. त्याने फिर्यादीला पोरं आली असल्याचे सांगत घरात येण्यास सांगितले.
फिर्यादी व अभिमान यांनी घरात जाऊन आतून दरवाजा बंद केला.
आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन घराच्या दरवाज्यावर कोयते मारत शिवीगाळ केली.
तसेच घराच्या खिडक्यांवर दगड मारुन खिडक्यांच्या काचा पोडल्या.
आरोपी सागर याने अविनाश माने घरातच आहे असे म्हणत शिवीगाळ करुन दमदाटी केली.
त्यावेळी आरोपी अमन शेख आणि करण टाक यांनी हातातील लोखंडी कोयते
हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | The incident in Bouddhanagar in Pimpri, where gangs ran riot with koytas in their hands; FIR against 9 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना

Nashik Crime News | नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ravindra Dhangekar | आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट, बापटांनी दिला ‘हा’ कानमंत्र (व्हिडिओ)

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ऑनलाईन नोंदणी केलेल्या 15 हजार शेतकऱ्यांचे धान पडून; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ