Chhatrapati Sambhaji Raje | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूळ उपाध्या वेगळ्या आहेत,’ धर्मवीर वादावर छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही महिन्यांपासून छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरून राज्यात चांगलाच वाद सुरू आहे. याबाबत नुकतच संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘आता आपण त्यापलिकडे जाण्याची गरज आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या मूळ उपाध्या वेगळ्या आहेत.’

 

महाराजांना या उपाध्या या १०० ते २०० वर्षात आमच्यासारख्या लोकांकडून दिलेल्या आहेत. तर मी आजवर केलेल्या भाषणांमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असं सांगितलं. त्यावेळी कोणाच्या लक्षात आले नाही. पण आता धर्मवीर शब्दावरून वेगवेगळे राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, अशी भूमिका संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना मांडली.

 

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता, आपल्या राज्याला काय मिळालं? हा प्रश्न विचारला असता. त्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, ‘मी काल रायगडावर होतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले याबद्दल मला माहिती नाही. मी किल्ल्यावर असल्याने मला दुसर काही सुचत नव्हते. रायगड किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल. मी त्यामध्ये मग्न होतो.’ असे यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial in Arabian Sea) बोलताना संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जलपूजन कार्यक्रमास गेलो होतो. पण आता त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. तसेच आता राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत किमान त्या तरी त्यांनी करण्याची गरज आहे. ती म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्या प्रकारे रायगड किल्ल्याचे संवर्धन सुरू आहे, त्या धर्तीवर किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे.’ अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारकडे केली.

 

तसेच यावर पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ‘आपल्या राज्यात समुद्राच्या किनाऱ्यावर सर्वाधिक किल्ले आहेत.
त्याबाबतचा प्लान माझ्याकडे आहे. त्यावर मी बोलून थकलो असून त्याची कोणीही दखल घेत नाही.
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आला आहात ना,
तर राज्यातील गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.’
अशी मागणी देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत केली.

 

Web Title :- Chhatrapati Sambhaji Raje | mla sambhaji raje comment on dharmveer and comment on pm modi mumbai visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना