Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp | नाना पेठ येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

पुणे : Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध (Aundh ITI) यांच्यावतीने ५ जून रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नाना पेठ, पुणे (Dr. Babasaheb Ambedkar College, Nana Peth, Pune) येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे प्रभारी उपसंचालक आर.बी.भावसार (R.B. Bhavsar) यांनी कळविले आहे.
या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. अभ्यासक्रमासंदर्भातील माहिती, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असून स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉलदेखील लावण्यात येणार आहेत.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नोंदणीसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी क्यू. आर. कोडच्या सहाय्याने नोंदणी
करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Web Title : Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp In Dr. Babasaheb Ambedkar College Nana Peth Pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pankaja Munde | ‘अनेक बंदुका माझ्या खांद्यावर…’, पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान
Shasan Aplya Dari – Pune News | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम