Maharashtra Politics News | ‘… यापेक्षा थुंकणं चांगलं’, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची सयंमी प्रतिक्रिया, म्हणाले- ‘ती मोठी माणसं, आम्ही त्यांचा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांचासंदर्भात प्रश्न विचारताच संजय राऊत (MP Sanjay Raut) काल ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. यावर संजय राऊत यांनी अजित पवारांच्या जुन्या (Maharashtra Politics News) वक्तव्याचा दाखला देत पलटवार केला होता. यावर आता अजित पवार यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, असे अजित पवार यांनी संजय राऊतांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली होती. यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असं म्हणत राऊतांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ज्याचं जळतं त्याला कळतं असही राऊत म्हणाले. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षासोबत उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या (BJP) पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असंही राऊत म्हणाले. (Maharashtra Politics News)

ती मोठी माणसं आहेत – अजित पवार

संजय राऊतांनी अजित पवारांवर पलटवार केल्यानंतर अजित पवार यांनी सयंमी प्रतिक्रिया दिली. ते काहीही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे
(Kalyan Lok Sabha Constituency) खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील,
असे श्रीकांत शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला.
संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेव्हा पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले.
श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली

Web Title :  Maharashtra Politics News | ajit pawar reaction on that statment of sanjay raut says

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीमध्ये अडकलेला पक्ष ! जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते – आप राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा