हलाल होत असताना दिसले चार पाय आणि वाचला जीव

पिंपरी-चिंचवड : कृष्णा पांचाळ

ऐकाव ते लवलच, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या तन्वीर चिकन सेंटरवर चक्क चार पायाची कोंबडी आढळली आहे.यामुळे चिकन सेंटरला भेट देणाऱ्या बघ्यांची गर्दी वाढली.कुतबुद्दीन होबळे यांच्या मालकीचे असणाऱ्या चिकन सेंटरवर शनिवारी सकाळी आठ च्या सुमारास त्यांचा मुलगा तन्वीर होबळे हा कोंबड्या हलाल करत होता.त्यावेळी त्याला चार पायाची कोंबडी दिसली याची माहिती त्याने त्याचा वडिलांना दिली.

शहरातील निगडी परिसरात तन्वीर चिकन सेंटर हे कुतबुद्दीन होबळे याच्या मालकीचे असून गेली ३० वर्ष झालं ते चिकन सेंटर चा व्यवसाय करत आहेत. शनिवारी नेहमी प्रमाणे कोंबड्या घेऊन येणाऱ्या टेम्पो मधून काही कोंबड्या तन्वीर होबळे यांनी घेतल्या.त्या सकाळी आठ च्या सुमारास हलाल करायच्या होत्या.हलाल करत असताना तन्वीरला कोंबडी हातात घेतल्यानंतर तिला चार पाय असल्याचं जाणवलं.त्याने ती कोंबडी बाजूला ठेवली आणि वडील कुतबुद्दीन यांना याची माहिती दिली,वडील हे पाहून आश्चर्य चकित झाले,वडील कुतबुद्दीन हे अगोदर त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.परंतु चार पायाची कोंबडी पाहिल्यानंतर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

[amazon_link asins=’B076H74F8N,B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f50d158-b429-11e8-ac4f-6b584925052c’]

हलाल होत असलेल्या कोंबडीला केवळ चार पाय असल्याने जीवनदान मिळाले आहे.तिची काळजी सध्या कुतबुद्दीन हे घेत आहेत.कोंबडीला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत असून अनेक ग्राहकांनी कोंबडी विकत मागितल्याचे त्यांनी सांगितले.जोपर्यंत कोंबडीचा जीव आहे तोपर्यंत सांभाळणार असल्याचं चिकन सेंटर मालक कुतबुद्दीन म्हणाले.