चिदंबरम यांना आणखी 4 ‘गैरव्यवहार’ भोवणार, ED ‘फास’ आवळण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मिडिया आणि एअरसेल मॅक्सिस शिवाय आणखी चार कंपन्यांचे परकीय गुंतणूकीचे प्रस्ताव कोटवधी रुपयांची लाच घेऊन परकीय गुंतणूक प्रोस्ताहन मंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आणि ही लाचेची रक्कम अनेक बनावट शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आली अशा संशय अंमलबजावणी संचालनालयाकडून व्यक्त करण्यात आली. यामुळे चिदंबरम व त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम मनी लॉड्रिगची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

या आहेत त्या चार कंपन्या –
ईडीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, जियाजियो स्कॉटलंड लिमिटेड, कटारा होल्डिंग्ज, एलफोर्ज लिमिडेट, एस्सार स्टील या चार कंपन्यामध्ये देखील गैरव्यवहार झाल्याचे दिसते आहे. ज्या बनावट शेल कंपन्या बनवून लाच म्हणून स्विकारलेली रक्कम भारतात आणि विदेशात वळवले यातील अनेक कंपन्यामध्ये चिदंबरम आणि कार्ति चिदंबरम लाभार्था असल्याची माहिती मिळत आहे.

चिदंबरम पिता पुत्रांची याचा लाभ व्यक्तीगत खर्चासाठी, अनेक विदेशी खात्यात जमा करण्यासाठी तसेच ब्रिटन, मलेशिया व स्पेन सारख्या इतर देशात स्थावर मालमत्ता खरेदीसाठी वापरले असा आरोप देखील ईडीकडून चिदंमबरम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

300 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या नोंदी –
विदेशी गुंतवणूक मंडळ त्या काळी थेट अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येत होते. यावेळी चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर करुन परवानग्या देण्यात आल्या होत्या असे ईडीचे म्हणणे आहे. तपास यंत्रणेंचा हा देखील दावा आहे की एका शेल कंपनीत 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्याच्या नोंदी तपासात दिसत आहेत.

ईडीचा फास चिदंबरम यांच्या भौवती अधिक आवळत चालल्याचे समोर येत आहे. कालच जवळपास 30 तासांच्या नाट्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –