Chief Justice Dhananjay Chandrachud | सरन्यायाधीशांनी मांडली स्पष्ट भूमिका! न्यायपालिकेचा निर्णय चुकीचा वाटला म्हणून कायदेमंडळ तो नाकारू शकत नाही

नवी दिल्ली : Chief Justice Dhananjay Chandrachud | फक्त अमुक निर्णय चुकीचा आहे असे वाटले म्हणून कायदेमंडळ न्यायपालिकेकडून आलेले निर्णय नाकारू शकत नाही. पण जर न्यायालयांनी (Supreme Court) एखाद्या कायद्याचा अमुक एक प्रकारे अर्थ लावला आणि कायदेमंडळाला त्यात काही चूक वाटली तर संसदेला त्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायदे समृद्ध करण्याची मुभा आहे. पण तुम्ही न्यायालयांचे निर्णय थेट नाकारू शकत नाही, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी व्यक्त केले. ते हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट २०२३मध्ये बोलत होते.

महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification Case) सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना दिरंगाईवरून वेळावेळी परखड शब्दात सुनावले आहे. तसेच याबाबत सरन्यायाधीशांनी दिलेले आदेश पाहता, त्यांचे वरील वक्तव्य लक्षवेधक ठरत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात सरन्यायाधीश (Chief Justice Dhananjay Chandrachud) पुढे म्हणाले की, न्यायाधीश थेट लोकांमधून निवडून येत नसल्यामुळे ते जनतेला उत्तरदायी नसतात. आमची जनतेकडून निवड होत नाही. जनतेतून निवड होणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा महत्त्वाची असते. ते जनतेला थेट उत्तरदायी असतात. ते संसदेला उत्तरदायी असतात.

ते पुढे म्हणाले, मी सरन्यायाधीश म्हणून या व्यवस्थेचा आदरच करतो.
पण न्यायाधीश ज्या भूमिका निभावतात, त्यांचेही महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे.
आम्ही जनतेतून निवडून येत नाही ही आपल्या व्यवस्थेतील कमतरता नसून व्यवस्थेचं सामथ्र्य आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, न्यायालयांना बंधुता, स्वातंत्र्य, समानता अशा व्यापक मूल्यांचे जतन,
संवर्धन व संरक्षण करावे लागते. त्या अनुषंगाने आम्ही न्यायव्यवस्थेवर एक सक्षम प्रभाव टाकत असतो.
काही ठिकाणी बळाच्या जोरावर सत्ता हस्तगत केली जाते. त्यावेळी न्यायालय अशी व्यवस्था असते,
जिथे लोकांना बदल घडवण्यासंदर्भात त्यांची स्वतंत्र भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याचा विश्वास वाटत असतो.

चंद्रचूड यांनी शेवटी म्हटले की, त्यामुळेच न्यायमूर्ती सार्वजनिक नैतिकतेऐवजी घटनात्मक नैतिकतेचे कायम पालन करतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजितदादांच्या आईने व्यक्त केली इच्छा, माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं