भाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप शिवसेना आता विधानसभेसाठी तयारी करत आहे. विधानसभेसाठी आधीच मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांनी सुरु केली आहे. शिवसेना जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. तर भाजप आता महाजनादेश यात्रेला सुरुवात करणार आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. शुभारंभाचा कार्यक्रम मुंबईत सुरु आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर आणि इतर विषयांवर आपले मत मांडले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा भाजपमध्ये स्वागत, पण येणाऱ्यांना तपासून घेऊ, असं वक्तव्य फडणवीसांनी केले आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यासाठी सांगितले आहे. लोकसभेतील यशानंतर जनतेला गृहीत धरु नका. विजयाचा अभिमान असावा पण गर्व नको, असं म्हणत कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा, असं त्यांनी सांगितले.

जनता आपलं दैवत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रेच आयोजन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच युद्ध बदललं आहे, शस्त्र आणि रणनितीही बदलावी लागणार, असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. या पिढीने दुष्काळ भोगला आहे. पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा आश्वासन दिलं.

आघाडीवर टीका करताना त्यांनी अनेक आरोप केले. दुष्काळ हा आघाडीसाठी सुकाळ होता. त्यांनी पैसा लाटण्यासाठी अनेक योजना आणल्या, असा आरोप केला. तसंच शिवरायांप्रमाणे रणनिती आखत विधानसभेचीही लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल याचा निर्णय जनताच करेल. सध्यातरी छोट्याछोट्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. तसंच विधानसभेतील युतीमधील जागांचा निर्णय लवकरच घेऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्यविषय वृत्त –