CM Eknath Shinde | काल ‘सागर’ बंगल्यावर खलबतं, एकनाथ शिंदे पाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्यातून थेट दिल्लीला गेल्याची माहिती पुढे येत आहे. ते दिल्लीत कोणाची भेट घेणार? यावर चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील सायंकाळी नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde) यांच्या दिल्ली फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections), 16 आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLAs Disqualified) निर्णय, मंत्रिमंडळ विस्तार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) यांच्या सूचनेनुसार विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत दिल्ली स्तरावर हालचाली सुरु आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने निवडणुका कधीही लागू शकते अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election (BMC)
कधीही लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
याचाच भाग म्हणून शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली होती.
या बैठकीला मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदार उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाची रणनीती या बैठकीत ठरली असल्याची माहिती आहे.

 

Web Title :  Chief Minister Eknath Shinde, Devendra Fadnavis leaves for Delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा