Chief Ministers Gun Collection | भारतातील 8 मुख्यमंत्र्यांपैकी सगळ्यात महाग बंदुका CM एकनाथ शिंदे यांच्याकडे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – Chief Ministers Gun Collection | देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेती माहिती निवडणूक आयोगाकडे आहे. आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांजवळ शस्त्रे आहेत. कोणकोणत्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडे बंदुका आहेत ते जाणून घेऊयात. (Chief Ministers Gun Collection)

 

यामध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याकडे ३ लाखांची बंदूक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माहितीप्रमाणे त्यांच्याजवळ एकूण ५ लाखांची शस्त्रे आहेत. त्यात एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहे. (Chief Ministers Gun Collection)

तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवेंद्रसिंह चौहान यांच्याजवळ रिव्हॉल्व्हर असून, त्या या रिव्हॉल्व्हरची किंमत ५ हजार ५०० रुपये अशी त्यांनी आयोगास सांगितलेल्या माहितीत नमूद केले आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी निवडणूक आयोगास दिलेल्या माहितीत त्यांच्याकडे फक्त रायफल असल्याचे म्हटले आहे. यातच मणिपूरचे सीएम एन बिरेन सिंग यांनी त्यांच्याकडील पावणे दोन लाखांची पिस्तूल असल्याचे सांगितले आहे. आपचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तर २० हजार रुपयांची फक्त बंदूक असल्याचे आयोगास सांगितले. या सर्वांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत त्यांच्याकडे रायफल असल्याचे नमूद केले आहे.

 

यातील सर्वांत महागडी शस्त्रे वापरणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा क्रम अव्वल लागत आहे.

 

Web Title :- Chief Ministers Gun Collection | cm arm collection eknath shinde
yogi adityanath to bhagwant mann list of chief ministers own guns

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा