औरंगाबाद कचराप्रश्नी मुख्यमंत्र्याची नागपुरात बैठक, तर महापौर मातोश्रीवर 

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन 
ओरंगाबादचा कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता पावसाच्या दिवसात तरी कचऱ्याबाबतची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. औरंगाबादच्या कचराप्रश्नी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. औरंगाबाद महापालिकेत महापौर शिवसेनेचे आहेत त्यांनीच या बैठकीला दांडी मारली. या बैठकीदरम्यान बोलताना “कचारप्रश्नी कठोर निर्णय घ्या, कुणाचही ऐकून घेऊ नका, वेळ प्रसंगी औरंगाबाद महापालिका बरखास्त करु , असे निर्देश मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना दिल्याची माहिती आहे.
[amazon_link asins=’B074CYP3CC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8863be6d-8a8d-11e8-8966-a3aba15a2b8f’]
याबाबत मिळालेली आअधिक माहिती अशी की, नागपुरात झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले ,सभागृह नेता आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दांडी मारली. विशेष बाब म्हणजे औरंगाबाद महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे. महापौर शिवसेनेचे आहेत तर उपमहापौर भाजपचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी आैरंगाबाद कचरा प्रश्नी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिल्याची माहिती बैठकीतील सूत्रांनी दिली.
या बैठकीला एमआयएम आमदार इम्तियाज जलील, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पण शिवसेनेचे कोणीही उपस्थितीत नव्हते. बैठक संपण्याच्या पाच मिनिट अगोदर शिवसेना आमदार संजय शिरसाठ आले. विधानसभेत हक्कभंगावर भाषण असल्याने उशिर झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a44015a-8a8d-11e8-b645-f52108330bd3′]
‘त्यांची’ उपस्थिती मातोश्रीवर 
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीऐवजी ‘मातोश्री’ वरच्या बैठकीला जाणे  पसंत केले. औरंगाबादच्या कचराप्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मुंबईतल्या बैठकीला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.  या बैठकीत औरंगाबाद कचराप्रश्न, जल वाहिन्या, बाळासाहेब ठाकरे स्मारक यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
पावसाळा सुरु झाल्यापासून औरंगाबादचा कचराप्रश्न आणखी गंभीर बनला आहे. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे, तर पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये नाकाला रुमाल लावून चालण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a600c485-8a8d-11e8-bc64-bddc3c988f43′]