डॉक्टर व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गेले बाळ चोरीला

कंधार: पोलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुळा ता. कंधार येथे दि ०४ /०५/२०१८ रोजी सकाळी एका मातेने गोंडस बाळाला जन्म दिला त्या वेळी त्या मातेची तब्बेत अधिक चांगली नसल्याने त्या मातेला कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात १०८ या रुग्णसेविकेने नेण्यात आले पण अधिक सोयी सुविधा त्या वेळी नसल्याने त्या बाळाला तेथेच ठेवण्यात आले होते. त्या मातेचे तब्बेत बरी झाल्याने ती विचारणा केली असता तिचे बाळ चोरीला गेल्याचे समजल्याने तिच्यावर व तिच्या परिवारावर एक मोठं संकट उभा केल आहे. एवढी मोठी घटना होऊन देखील सुद्धा डॉक्टर व कर्मचारी बिनधास्त वावरत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ba2b3e4-c872-11e8-9aa2-8bc30e806e1b’]
डॉक्टर व कर्मचारी यांच्या उपस्थितीत  बाळ चोरीला गेलं. त्या मुलीला प्राथमिक उपचार दिला का अशी विचारणा केली असता बाळ त्या ठिकाणी  नसल्याचे धक्कादायक वृत्त समजल्यावर माता मूकी होऊन स्तब्ध झाली व तिच्या व काळोख पसरला अशी घटना प्रथमच तालुक्यात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही गावातील व परिवारातील मंडळी घटनास्थळा वरून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतले परंतु गुन्हा लवकर नोंदवून घेतलं नव्हता रात्री उशीरा गुन्हा नोंद कंधार पोलिसांकडून करण्यात आल्याचे समजले दवाखान्यात कॅमेऱ्याची सजावट करण्यात आली पण ती कॅमेरे बंद असल्याने हा प्रकार घडला असल्याचे ही तेथील चर्चेला उधाण आले आहे संबंधित डॉक्टर व कर्मचारी वर कुठली कार्यवाही वरिष्ठ अधिकारी कडून होईल का अशी चर्चा होत आहे.

[amazon_link asins=’B01J22KFRY,B07BCCFBKZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83e61c2d-c873-11e8-a131-0bd26b898a60′]