Coronavirus : खळबळजनक ! चीननं 6 दिवसापर्यंत लपवून ठेवली होती ‘महामारी’ कोरोनाबाबतची माहिती, जाणकारांचा धक्कादायक ‘खुलासा’…

वुहान :  वृत्तसंस्था –   कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुळे जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोना साथीच्या बाबतीत चीनने संपूर्ण जगाला अंधारात ठेवले नाही तर आपल्या नागरिकांना देखील याची माहिती दिली नाही. चीनमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून चीनने वुहान शहरात एक नवा विषाणू आढळून आला आहे आणि हा विषाणू साथीचा रोग होऊ शकतो अशी माहिती चीनने सहा दिवस (14 ते 19 जानेवारी) लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सातव्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी रोजी नागरिकांना याची माहिती देऊन सतर्क केले. पण तोपर्यंत लाखो लोक परदेशी आणि इतर शहरांमध्ये चिनी नववर्ष साजरा करण्यासाठी गेले होते. एवढेच नाही तर तो पर्यंत देशात 3 हजाराहून अधिक जणांना याचा संसर्ग झाला होता.

लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ झ्यूओ फांग झांग म्हणाले, जर चिनने सहा दिवसांपूर्वीच योग्य पाऊल उचलले असते तर आज रुग्णांची संख्या खूपच कमी झाली असती. चीनी सरकारच्या अंतर्गत सुत्रांच्या माहितीनुसार, 5 जानेवारी ते 17 जानेवरी दरम्यान शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रोग नियंत्रण केंद्राने एकाही रुग्णाची पुष्टी केली नाही. एवढेच नाही तर चीनी सरकारने या विषाणूविषयी उशीराने माहिती दिली नाही तर जगला या विषाणूबद्दल चेतावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांवर अफवा पसरवण्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली.

शिकागो विद्यापीठातील चीनी राजनीतीचे प्राध्यापक डॉल यांग म्हणाले की, 13 जानेवारी रोजी चीनच्या बाहेर थायलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर चीनने देशातील जनतेला याची कल्पना न देता देशव्यापी योजना सुरु केली. चीन सरकार सांगत होते की, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला याची माहिती दिली आहे. परंतु कागदपत्रावरून असे दिसून येते की चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रमुखांनी 14 जानेवारी रोजी प्रांतीय आरोग्य अधिकाऱ्यांसह गोपनीय फोन संभाषण करून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर याची माहिती राष्ट्रपती चिन्फिंग यांना दिली.