काय सांगता ! होय, पाकिस्तानला वाचवण्यासाठी 1 लाख बदकांची सेना पाठणार चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी झुंज देऊनही चीन आपला खास मित्र पाकिस्तानला पुन्हा एकदा संकटात मदत करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या म्हणण्यानुसार, देशाला या दशकातील सर्वात मोठ्या टोळ हल्ल्यापासून वाचवण्यासाठी चीन १ लाख खास प्रकारच्या बदकांची फौज पाठवणार आहे. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातून पाठविण्यात येत असलेले हे बदक टोळ हल्ल्यापासून वाचण्यासाठीचे सर्वात पहिले शस्त्र म्हणून काम करतील.

दरम्यान चीनने आधीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि पाकिस्तानला सल्ला देण्यासाठी एक तज्ञांची टीम पाकिस्तानात पाठविली आहे. विशेष म्हणजे दोन दशकांपूर्वी चीनच्या शिनकियांग मध्ये असाच पद्धतीचा टोळ हल्ला झाला होता तेव्हा चीनने याच बदकांना तैनात केले होते. हे बदक दिवसातून बरीच टोळ खातात. अशा परिस्थितीत कीटकनाशकाऐवजी बदकाचा वापर केल्यास खर्चही कमी होतो आणि पर्यावरणालाही नुकसान पोहचत नाही. एका वृत्तपत्राने झेजियांग प्रोविंशियल इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चरल टेक्नोलॉजीचे संशोधक लू लिजी यांच्या म्हणण्यानुसार माहिती दिली की कीटकनाशकांच्या ठिकाणी बदकांचा वापर केल्याने पर्यावरणाला होणारा खर्च आणि हानी देखील कमी होते.

लू म्हणाले की, इतर पाळीव पक्ष्यांपेक्षा बदके हे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांचे म्हणणे आहे की, ‘बदके समूहात राहणे पसंत करतात आणि यामुळे कोंबड्यांपेक्षा त्यांची देखभाल अधिक सुलभतेने होते.’ त्यांनी असेही सांगितले की, एका दिवसात एक बदक २०० पेक्षा जास्त टोळ खाऊ शकतात आणि त्यांच्यात तीनपटीने अधिक लढण्याची क्षमता असते.

You might also like