अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनीं पुन्हा साधला चीनवर निशाणा, म्हणाले – ‘शेजार्‍यांशी दुष्ट पध्दतीनं वागतोय ड्रॅगन’

वॉशिंग्टनः वृत्तसंस्था – भारतासह अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या चिन विरुद्ध अमेरिकेने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी शुक्रवारी म्हटले की, चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) त्यांच्या शेजारांसोबत वाईट वृत्तीनेच नाही तर अमेरिका आणि युरोपमध्ये दुर्भावनापूर्ण सायबर कारवायां करत आहे

डेनमार्कच्या कोपेनहेगन येथे लोकशाही या विषयावर ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना चिनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, चीन नकारात्मक वातावरण निर्माण करीत आहे. उर्वरित जगा प्रमाणेच युरोपलाही त्यांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या आठवड्याच्या सुरुवातीला पोम्पीओने हवाई येथे एका वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यासोबत चर्चा केली होती. दरवाजाआड झालेली बैठक सात तासापेक्षा अधिक वेळ चालली होती.

चिनी सरकारवर कडक शब्दात बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, सीपीपी नाटो सारख्या संस्थांच्या माध्यमातून जगाला मिळत असलेल्या प्रगतीमध्ये अडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असून केवळ बिजींगला फायदा होणारे नियम व निकषांचा अवलंब करण्याची सीपीपीची इच्छा आहे. त्यांनी भारतासारख्या लोकशाही देशासोबत सीमा विवाद वाढवला आहे. ते दक्षिण चीन समुद्राचे सैनिकीकरण करीत आहे, तेथील अधिक भागावर त्यांनी बेकायदेशीर दावा केला आहे, जो एक गंभीर धोका आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले की, बऱ्याच वर्षापासून पाश्चिमात्य देशांना आशा आहे की ते चिनी कम्युनिस्ट पक्षाला बदलू शकतील आणि चिनी लोकांचे आयुष्य सुधारू शकतील. मात्र, चीन आमच्याशी आमच्याशी चांगले संबंध असल्याचे भासवून आमच्या सद्भावनांचा फायदा घेत आहे. युरोपियन आणि अमेरिकन कंपन्या आशावादी विचारांनी चीनमध्ये गुंतवणूक करतात. शेन्झेनसारख्या ठिकाणी पुरवठा श्रृंखलांचे आऊटसोर्स केले गेले, PLA संलग्न विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था उघडल्या आणि त्यांच्या देशातील चीनी गुंतवणूकीचे स्वागत केले. परंतु सीपीपीने संयुक्त राष्ट्र नोंदणीकृत काराराचे उल्लंघन करून हँगकाँगमध्ये स्वतंत्र्या संपवण्याचा निर्णय घेतल्याचे, माईक पोम्पीओ म्हणाले.

चीनच्या वृत्तीबद्दल बोलताना ते म्हणाले की, हाँगकाँग प्रकरणात चीन जे करत आहे ते फक्त एक उदाहरण आहे, यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन झाले आहे. ते मानवाधिकारांचे उल्लंघन करून चिनी मुस्लिमांवर अत्याचार करत आहेत आणि आता त्यांनी भारताशी सीमा वाद वाढविला आहे. विशेष म्हणजे 1967 च्या नाथू ला संघर्षानंतर दोन्ही देशांमधील गलवान खोऱ्यातील संघर्ष, ही सर्वात मोठी हिंसक घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 300 सैनिक मारले गेले होते. कोरोना व्हायरसवरून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनवर पुन्हा एकदा निशाणा साधला, ते म्हणाले चीन वारंवार खोट बोलत आहे. त्यांच्यामुळेच आज संपूर्ण जगभरात महामारी पसरली आहे.