Lockdown : जग ‘लॉकडाऊन’मुळं ‘त्रस्त’, मात्र चीन सर्वात मोठं फुटबॉल स्टेडियम बनवण्यात मद’मस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील लोक कोरोना विषाणू या प्राणघातक साथीच्या आजाराने चिंतीत आहेत, तर दुसरीकडे चीनने आपल्या मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. चीनने जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम सुरू केले आहे. हे स्टेडियम कमळाच्या आकाराचे असणार आहे.

ग्वांगझोउ एव्हरग्रेंडे हे व्यावसायिक क्लब हे स्टेडियम उभारत आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे 13 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे स्टेडियम एकावेळी 1 लाख लोकांना बसविण्यास सक्षम असेल. हे स्टेडियम 2022 पर्यंत तयार होईल. या स्टेडियममध्ये 16 व्हीव्हीआयपी खासगी खोल्या असतील. तेथे 152 व्हीआयपी खाजगी खोल्या असतील. तसेच फिफा क्षेत्र आणि अ‍ॅथलीट क्षेत्र असेल. त्याच्या ग्राउंड ब्रेकिंग प्रोग्राममध्ये 200 हून अधिक ट्रक दाखवण्यात आले आहेत, ते आता कामास लागले आहेत.

स्टेडियममधील सामन्याच्या कव्हरेजसाठी वेगळ्या पद्धतीने माध्यमांचे क्षेत्र व प्रेसरूम तयार केले जात आहे. फॅबिओ कॅन्नावारो हे सध्या प्रोफेशनल क्लब ग्वांगझोउ एव्हरग्रेंडेचे प्रशिक्षक आहेत. ते स्टेडियमच्या ग्राऊंड ब्रेकिंग कार्यक्रमातही उपस्थित होते.

सध्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचे कॅम्प नाउ स्टेडियम आहे. याची क्षमता 99,354 आहे. आता क्लबला आणखी दोन स्टेडियम बांधायचे आहेत.