COVID-19 मधून बरे झालेले रुग्ण विशिष्ट ‘अँटीबॉडी’ तयार करतायत, ‘त्या’पासून बनवली जाऊ शकते ‘लस’

बीजिंग :  वृत्तसंस्था –  जभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विरोधात लढा देत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसून प्रत्येक देश लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच कोरोना विषाणूबाबत दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोना रोगापासून बरे झालेले बहुतेक रुग्ण विविध विशिष्ट प्रकराची अँटीबॉडी आणि टी पेशी तयार करतात. जे या प्राणघातक रोगावर प्रभावी लस तयार करण्यात फायदेशीर ठरू शकतात.

दोन आठवड्यात रुग्णात दिसले अँटीबॉडी

रोगप्रतिकारक नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामध्ये संशोधकांनी विविध प्रकारच्या रोग-प्रतिरोधक प्रतिक्रियांसह 14 रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी 6 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवालातून असे दिसून आले की रुग्णामध्ये अँटीबॉडी दोन आठवड्यापर्यंत तशीच होती. या अभ्यासद्वारे हे देखील दिसून येते की, या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी व्हायरसचा कोणता भाग अधिक प्रभावी आहे. म्हणून, त्यांना संभाव्य लसींच्या माध्यमातून लक्ष्य केले जावे.

बी आणि टी पेशी संक्रमणापासून संरक्षण करतात

सिंघुआ विद्यापीठाचे अभ्यासक वरिष्ठ चेन डोंग यांनी सांगितले की, आमच्या निष्कर्षावरून असे सूचित होते की बी आणि टी दोन्ही पेशी विषाणूजन्य संसर्गाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्तीच्या मध्य भागाचे संरक्षण करतात. त्यांनी नमूद केले की आमच्या संशोधनामुळे संरक्षणात्मक प्रतिकारशक्तीचे पुढील विश्लेषण आणि कोरोना विषाणूच्या विकासाचे अंतर्गत तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी एक आधार आहे. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी लसदेखील तयार होऊ शकते.

सार्स-सीओव्ही – 2 वर सखोल अभ्यासाची गरज

चीनमधील अॅकेडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सच्या चेंग-फेंग क्विन यांनी सांगितले की, सार्स-सीओव्ही -2 विषयी आपल्याकडे खूप कमी माहिती आहे. जर याचा सखोल अभ्यास केला गेला तर प्रभावी लस तयार करण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.