‘या’ 3 कारणांमुळं राफेलला काऊंटर करणारे रडार सिस्टीम पाकिस्तानला देण्यास चीननं दिला साफ नकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात राफेल फायटर दाखल झाल्यापासून पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. राफेलचा सामना करावा लागणार असल्यामुळे पाकिस्तानने आपला मित्र असलेल्या चीनकडून उधार लढावू विमान मागितले. मात्र चीनने ते देण्यास साफ नकार दिला आहे. मात्र तरीही परत पाकिस्तानने चीनला अपग्रेड रडार आणि एअरक्राफ्टची मागणी केली होती. परंतु पाकिस्तानला या ठिकाणी देखील नकाराला सामोरे जावे लागले आहे.

इम्रान खान आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी JF-17 या रडारला अपग्रेड करण्याची मागणी चीनकडे केली होती. मात्र चीनने पाकिस्तानच्या या मागणीला चीनने साफ नकार दिला आहे.

या कारणांमुळे चीनने पाकिस्तानला दिला नकार
1. चीनला वाटते की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे तो कर्जफेड करू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला क्रेडिटवर हत्यारे देणे योग्य होणार नाही. तसेच काश्मिरातील दहशतवाद्यांकडून मिळणारे चिनी ग्रेनेड आणि चिनी हत्यारामुळे चीन पाकिस्तानवर नाराज आहे.

2. सूत्रांच्या माहितीनुसार चीन ने म्हटले की शस्त्रे ही पाकिस्तानच्या लष्करासाठी देण्यात आली होती. मात्र ती दहशतवाद्यांच्या हातात कशी पोहचली ? चीनला वाटते की त्यांनी दिलेली हत्यारे दहशतवाद्यांकडे पोहचतात. यामुळे चीनचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते आणि हा संदेश जातो की चीन काश्मीरमधील दहशतवाद्यांची मदत करत आहे. मात्र चीनची मजबुरी आहे कारण चीनने या आधी देखील पाकिस्तानमध्ये खूप गुंतवणूक केली आहे.

3.चीनने पाकिस्तानी इकनॉमिक कॉरिडॉरमध्ये 46 बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली आहे. यामध्ये सुद्धा खूप उशीर होत आहे. एवढे असूनही भारतात चिनी गोष्टींची एक मोठी बाजारपेठ आहे आणि चीनमधील उईघुर मुस्लिमांना पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून समर्थन दिल्या गेल्यामुळे चीन नाराज आहे.

Visit : Policenama.com