नकळत ! फक्त एका लिफ्टमुळे महिलेने 71 जणांना केले ‘कोरोना’ संक्रमित

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना शिंकताना-खोकताना तोंडावाटे निघणार्‍या थेंबांच्या संपर्कात आल्यास पसरतो, असे असताना तो हवेमार्फतही पसरू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केले आहे. दरम्यान आता चीनमधील एका प्रकरणाने चिंता अधिक वाढवली आहे.

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना, सुरुवातीला कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आलेली असताना आणि पूर्ण खबरदारी घेऊनदेखील एका महिलेने तिच्या नकळत एक-दोन नव्हे तर तब्बल 71 जणांना कोरोना संक्रमित केले आहे. याला कारणीभूत ठरली ती लिफ्ट होय. चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने या प्रकरणाचा अभ्यास केला. 19 मार्चला ही अमेरिकेहून चीनच्या हेलोंगजिआंगमध्ये परतली. तिची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आली.

तरीदेखील या महिलेने खबरदारी म्हणून स्वत:ला घरात क्वारंटाइन केले. विशेष म्हणजे जेव्हा ती आपल्या घरी परतली तेव्हादेखील ती लिफ्टमध्ये एकटीच गेली होती. मात्र तिनं लिफ्ट वापरल्यानंतर थोड्यावेळाने तिच्या शेजार्‍यांनी लिफ्टचा वापर केला. हीच लिफ्ट कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरली असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला.