Flipkart, Zomato वरुन ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान ! चीनचा तुमच्यावर वॉच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण असताना चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. वृत्त एका इंग्रजी पेपरच्या वृत्तानुसार, यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका ते उद्योगपती यांचा समावेश आहे. मात्र आता याचा थेट फटका तुम्हाला देखील बसू शकतो.

या अधिकाऱ्यावर देखील ठेवले जातेय नजर

हायब्रीड वॉरफेअर आणि चिनच्या विस्तारासाठी डेटा वापरण्यात ही कंपनी सर्वोत्कृष्ट मानली जाते. झेन्हुआच्या डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडकडून या लोकांचे रिअल टाईम मॉनिटरीग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ही कंपनी केवळ बड्या लोकांवरच लक्ष ठेवत नाही तर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, झोमाटो आणि स्विगी या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यावर देखील लक्ष ठेवून आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, उबर इंडियाचे ड्रायव्हर ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश, झोमाटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल, आणि स्विगीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन रेड्डी यांच्यावरही चीन नजर ठेवून आहे.

या कॅबिनेट मंत्र्यावर ठेवली जातेय नजर

काही कॅबिनट मंत्र्यांच्या रिअल टाईम डेटादेखील चीनच्या नजरेत आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा समावेश आहे. तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह तीन सैन्यदलांच्या किमान 15 माजी प्रमुखांचेही या यादीत नाव आहे.

चीनला कशी मिळते माहिती ?

रिपोर्टनुसार, या वृत्तपत्राने बिग डेटा टुल्सचा वापर करुन झेन्हुआच्या या ऑपरेशनशी संबंधित मेटा डेटाची तपासणी केली. त्यानंतर ही माहिती उघडकीस आली. तपासणी दरम्यान भारतीय संस्थांशी संबंधित माहिती मोठ्या लॉग फाईल डंपमधून काढली गेली. डेटा लीक करणाऱ्या कंपनीने याला ओव्हरसीझ इन्फॉर्मेशन डेटाबेस असे नाव दिले आहे. या डेटाबेसमध्ये एडवान्स लँग्वेज, टार्गेटिंग आणि क्लासिफिकेशन टूल वापरले गेले आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युएई यांचीही नोंद आहे.

डेटा चोरणारी कंपनी 9 सप्टेंबर पासून बंद

या रिपोर्टनुसार या इंग्रजी वृत्तपत्राने 1 सप्टेंबर रोजी www.china-revival.com या वेबसाईटवर दिलेल्या ईमेल आयडीवर एक क्वेरी पाठवली होती, त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 9 सप्टेंबर रोजी या कंपनीने आपली वेबसाइट पॅसिव्ह केली आहे. आता ही वेबसाईट उघडली जात नाही.

इतर देशांकडून डेटा चोरण्यास सांगितले

या रिपोर्टनुसार, दिल्लीतील चिनी दूतावासाच्या एका सुत्राने म्हटले आहे की, चीन सरकारने कंपन्या किंवा व्यक्तींना चिनी सरकारच्या बॅकडोर किंवा स्थानिक कायद्याचे उल्लंघन करुन इतर देशांकडून डेटा चोरी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, जर चिनी सरकारने असे म्हटले नाही तर मग चिनी सरकारने ओकेआयडीबी डेटा कशासाठी वापरला.