‘या’ महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकते ‘कोरोना’ची लस, ‘आत्मविश्वासा’नं चीननं सांगितलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीन सरकारच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने (SASAC) म्हटले आहे की चीन निर्मित कोरोनाची लस या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एसएएसएसीने चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीचॅटवर ही माहिती दिली आहे. अहवालानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्टने ही लस तयार केली आहे. चाचणी दरम्यान ही लस 2000 लोकांना देण्यात आली होती.

एसएएसएसी (SASAC) ने म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस ही लस बाजारात येऊ शकते. ही लस क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स हे सरकारच्या फार्मास्युटिकल ग्रुप सिनोफार्मशी संबंधित आहेत. सिनोफार्मच्या व्यवस्थापनावर एसएएसएसी देखरेख ठेवते.

अहवालानुसार, बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स एका वर्षात 10 ते 12 कोटी डोस लस तयार करू शकतात. तथापि, चीनमध्ये एकूण 5 कोरोना विषाणूच्या लसींवर चाचण्या सुरू आहेत. परंतु बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या लसीवर इतर कोणत्याही कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान अमेरिकेची मॉडर्ना कंपनी आणि ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना लसला सुद्धा प्राथमिक चाचणीत यश मिळाले आहे.