गलवान खोऱ्यातून ‘शव’ उचलून पळाले चिनी हेलिकॉप्टर्स, भारतीय जवानांकडून मार खाल्लेल्या ‘ड्रॅगन’च्या सैनिकांचे तुटले ‘मनोबल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे. याचा अंदाज यावरून येऊ शकतो की दिवसा झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह घेण्यासाठी चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर संध्याकाळी अंधार झाल्यावर आले होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे चीनने संध्याकाळ होताच आपले पश्चिमोत्तर एअर स्पेसला रिकामे केले आहे. तथापि चीनने कोणतीही अधिकृत नोटीस बजावली नसली, परंतु सिव्हिल आणि मिलिटरी फ्लाइट्सला ट्रॅक करणाऱ्या साइटने जो डेटा जाहीर केला आहे त्याकडे पाहता असे दिसते की भारताच्या दिशेने संभाव्य स्ट्राइकची शक्यता लक्षात घेता पश्चिमोत्तर एअर स्पेसला राखीव केले गेले आहे.

संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोमवारी आणि मंगळवारी भारताच्या हातून मार खाल्लेल्या चिनी सैनिकांचे मनोबल खचल्याचे चीनच्या भूमिकेवरून दिसून येते. खरं तर, मंगळवारी उशिरा भारतीय माध्यमांमध्ये 20 सैनिकांच्या शहीद होण्याची बातमी पसरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता. या बैठकीला समांतर तिन्ही सैन्य प्रमुखांची बैठक सीडीएस विपिन चंद रावत यांच्यासमवेत सुरू होती. दरम्यान या दोन्ही महत्त्वपूर्ण बैठकीत काय घडले याबाबत माहिती उघडकीस येऊ शकली नाही.

चीनमधील सर्वोच्च कमांड आणि चिनी लष्करी तज्ञ दिल्लीत होत असलेल्या या घडामोडींवर बारीक नजर ठेवून होते. जेव्हा त्यांना काही खास मिळाले नाही, तेव्हा चिनी तयारी पूर्णपणे बचावात्मक मोडमध्ये आली. दरम्यान नेहमीच आक्रमक पावित्रा घेणारा चीन आता संयमाची भूमिका घेत आहे. तथापि, चालबाज आणि भेकड चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने गलवान व्हॅलीच्या सभोवतालची आपली उभारणी मजबूत केली आहे. चीननेही सुमारे चार हजार किलोमीटरच्या सीमेवर एअर आणि ग्राउंड पेट्रोलिंग वाढविली आहे. दरम्यान भारतीय संपूर्ण चीन सीमेवर आणि पाकिस्तान सीमेवर हाय अलर्ट वर आहेत.