MNS | ‘अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला’ – संदीप देशपांडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांची आज सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये (Interview) ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मी आजारी असताना डाव साधला, असा आरोप ठाकरे यांनी केला. ज्या आईने राजकारणात जन्म दिला तिलाच गिळायला निघालेली ही औलाद आहे, यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि निष्ठा व्यक्त करावी आणि मते मागावीत, असा घणाघात ठाकरे यांनी केला. यावर आता मनसेने (MNS) प्रतिक्रिया दिली आहे.

 

मनसेचे (MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटले आहे की, अडीच वर्ष संपत्ती कमावली आणि आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतून होत आहे. कर्माची फळे इथेच भोगायची असतात. नियती तिचे चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत केली तिच आज तुमच्यावर वेळ आली आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) मोठ्या आजारपणाशी लढत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) व्यस्त होते. तेव्हा शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक फोडण्याचे पाप केले आज तेच तुमचे आमदार फुटून होत आहे.

 

संदीप देशपांडे म्हणाले, बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव वापरू नये म्हणता. जेव्हा स्मारकासाठी जागा मागितली तेव्हा बाळासाहेब ठाकरे सर्वांचे होते. आता एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्यावर कुणाचा मालकी हक्क नाही. तुम्ही सोयीनुसार अर्थ बदलणार का?

 

मुलाखतीवर टीका करताना देशपांडे म्हणाले, आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरे अशी आजची मुलाखत होती. हाच पालापाचोळा तुमच्यासोबत अडीच वर्ष घट्ट होता. जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे. बेस्ट सीएमचा सर्व्हे केवळ उद्धव ठाकरेंपुरता केला होता का? तुम्ही घरात बसला म्हणून महाराष्ट्राची वाट लागली. त्याचे कौतुक कसले करता?

 

भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार (BJP Leader Sudhir Munguntiwar) यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले आहे.
मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा असे म्हणता.
इतरांना गद्दार बोलता. मुलाखतीत म्हणता माझ्या वडिलांचे फोटो लावून मते मागितली.
मग 2019 मध्ये निवडणुकीत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही (PM Narendra Modi) फोटो होते.
मोदी तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही फोटो का लावता?

मुनगंटीवार यांनी पुढे म्हटले आहे की, सूडाचे राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) नोटीस,
राणेंवर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी
हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार नाही असे म्हटले तरी 14 दिवस जेलमध्ये टाकले.

 

Web Title :- MNS | shivsena betrayed raj thackeray during amit thackerays illness says mns sandeep deshpande

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा