Chitra Wagh | ‘इतिहास सांगतो आमुच्या स्त्रीने….’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा महाडिकांना घरचा आहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | प्लंबरची बायको प्लंबर आणि इलेक्ट्रिशनची बायको इलेक्ट्रिशन होईल का?, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महाडिकांच्या या वक्तव्याचा सर्वपक्षीय महिलांनी निषेध व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही महाडिकांना घरचा आहेर दिला आहे.

 

 

राणी लक्ष्मीबाईने (Rani Lakshmibai) झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊंनी राजा शिवछत्रपती (Raja Shivchatrapati) घडवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब (Aurangzeb) रडवला. इतिहास सांगतो आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला. महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

 

काळे ड्रेस (Black Dress) आणि काळी साडी परिधान करून महिलांनी ताराराणी चौकात (Tararani Chowk) आंदोलन केलं. कोल्हापूर भाजपचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नांचा धिक्कार अशा घोषणा महिलांनी दिल्या होत्या. यावर महाडिक यांनी स्पष्टीकरण देताना विरोधकांवर खापर फोडलं आहे.

 

दरम्यान, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, त्यामुळे त्यांनी माझं बोलणं अर्धवट दाखवत विपर्यास केला जात आहे. गेली 20 वर्षे अरूंधती महाडिक (Arundhati Mahadik) आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) महिला सबलीकरणासाठी काम करत असल्याचं महाडिक म्हणाले.

 

 

Web Title :- chitra wagh | chitra wagh on dhananjay mahadik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TV AC Mobile Price Hike | 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा भार ! टीव्ही, एसी, Mobile महागणार; तर CNG वाहनधारकांना दिलासा

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी