मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh On Aaditya Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नख्यांनी (Shivaji Maharaj Wagh Nakh) अफजलखानाचा वध केला त्या वाघनख्या इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयात आहेत. त्या वाघनख्या महाराष्ट्रात आणण्याल्या जाणार आहेत. यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका केली होती. आदित्या ठाकरेंच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh On Aaditya Thackeray)
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की फक्त शिवकालीन आहेत? याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा. तसेच ही वाघनखं किती वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली जात आहेत? याबाबतही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरुन शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. (Chitra Wagh On Aaditya Thackeray)
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे. छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत. पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे.
आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे. पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार…?, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
मुनगंटीवार लंडनला रवाना
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनख्यांनी बाहेर काढला
हे आपण लहान पणापासून शिकलो आहोत. ऐकत आलो आहोत. ती वाघनखे 350 व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या
दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यसाठी लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटत आहे, असे उद्गार
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले आहेत. यावेळी त्यांनी वाघनखांबाबत शंका
उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधत हे दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update