माझ्यापुढे माढा, बारामती शिवाय पर्यायच नाही : महादेव जानकर 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोनच पर्याय आहेत. मी स्वतः बारामतीतून लढण्यास आग्रही आहे तर माझे कार्यकर्ते मला माढ्यातून उभा राहण्याची मागणी करत आहेत. तर कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करायची हे मी येत्या आठ दिवसात जाहीर करणार आहे, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध 

मागील निवडणुकीत जनता मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपच्या बाजूने गेली होती. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे झाले आहे. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नसल्याने जानकर देखील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बारामतीबद्दल मोठे विधान करताना कमळाच्या चिन्हाचा उल्लेख केला होता.

हेही वाचा – मनधरणीसाठी दानवेंची खोतकरांच्या घरी पायधुळ

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या न्याय मागण्यासाठी वेळोवेळी मोठे लढे उभा केले होते. मात्र त्यांनी नजीकच्या काळात आरक्षणावर बोलणे सोडून दिले आहे. तसेच सरकारमध्ये राहून त्यांनी कधीच धनगर आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली नाही. तर दुसरीकडे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर सध्या राज्यात धनगर आरक्षणावर रान तापवत आहेत. अशा सर्व परिस्थितीमुळे जानकर भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढणार आहेत असे राजकीय जानकरांचे म्हणणे आहे.