‘कोलेस्ट्रॉल’मुळं हार्ट अटॅकसह उद्भवू शकतात अनेक गंभीर आजार ! ‘अशी’ घ्या काळजी

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण योग्य नसेल तर अनेक आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल 200 mg/dl पेक्षा कमी असायला हवं. एचडीएल कोलेस्ट्रॉल 40 mg/dl पेक्षा अधिक असायला हवं. याचं प्रमाण कमी जास्त झालं तर अनेक मोठ्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

एशियन हार्ट इंस्टिट्युटमधील तज्ञ सांगतात, शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानं शरीरात रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. Angina हा आजार होण्याचीही शक्यता असते. हे स्ट्रोकच्या समस्येचंही कारण असू शकतं.

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यानंतर डायबिटीज, रक्तदाबाच्या समस्या आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हार्ट कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवल्यास हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. यामुळं श्वासांची गती मंद होणं किंवा ब्लॉकेज होणं अशा समस्या येऊ शकतात.

रात्री उशीरापर्यंत काम केल्यानं हृदयाशी संबंधित आाजार होण्याचा धोका जास्त असतो. कारण यामुळं शरीरात फॅट्सचं प्रणाण वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. रात्री उशीरा जेवणाऱ्यांनाही याचा जास्त धोका असतो. याशिवाय झोपेवरही यामुळं परिणाम होतो. यामुळं वजन वाढतं. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.

काय काळजी घ्यावी ?

– तेलयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा.
– मांसाहार कमी करून किंवा जमल्यास टाळून संतुलित आहार घ्या
– रात्री उशीरापर्यंत काम करू नका.
– जेवणाची वेळ चुकवू नका.
– जास्त उपाशी राहणं टाळा
– ताण-तणावापासून दूर रहा.