कोल्हापूर : तुम्हाला कोरोना होऊन गेलाय किंवा नाही हे माहित करून घ्यायचंय ? मग ‘हे’ नक्की वाचा !

कसबा बीड (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन –  कोल्हापूरदेखील मुंबई, पुणे शहारांसोबत कोरोना हॉटस्पॉट बनत आहे. कारण कोल्हापूरात अशी लाखो लोकं आहेत ज्यांना कोरोना होऊन गेला आहे तरी त्यांना ते कळालेलंच नाही. कोल्हापूरचे सुपुत्र डॉ धनंजय लाड यांची क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिजम ही कंपनी जिल्ह्यात 1000 लोकांचा प्रतिपिंड (अँटी बॉडीज) चाचणी सर्वेक्षण (सेरॉलॉजिकल सर्वेक्षण) करणार आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कल्लशेट्टी यांनी क्रोमला सर्वेक्षम प्रकल्प राबवण्यास सांगितलं आहे. शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नैतिक समिती (एथिक कमिटी) व भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआर यांच्या मान्यतेचे सोपस्कारही पूर्ण झाले आहेत. यानुसार ना नफा ना तोटा या तत्वार हा प्रकल्प राबवण्याचा संकल्प आहे.

डॉ लाड यांनी विविध सामाजिक संस्था, उद्योजक व दानशूर व्यक्तींकडून निधी उभारून हा प्रकल्प तातडीनं राबवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कारण सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 20 लाख एवढा खर्च येणार आहे आणि एवढा खर्च करणं सध्या शक्य नाही.

कोल्हापूरात आजवर 15800 लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यावर शासनाचा कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली, जनजीवन विस्कळीत झाले, दुसरीरकेड मात्र लाखो लोकांना कोरोना संसर्ग होऊन गेला (हार्ड इम्युनिटी) आहे हे त्यांना काळालेलं देखील नाही किंवा त्याची कुठेही नोंद नाही. त्यावर मात्र शासनाचा एक पैसाही खर्च झालेला नाही.

मुंबईतील धारावी झोपडपट्टीत अनेक लोक दाटीवाटीत राहतात. अशा परिसरात लोकांमध्ये हार्ड इम्युनिटी तयार होऊन कोरोना संसर्गाला आळा बसला होता. मुंबई, पुणे, दिल्ली येथे टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करून नागरिकांमध्ये कोरोना विरूद्धची प्रतिपिंडे (अँटी बॉडीज) तयार झाली असल्याचा निष्कर्ष काढला होता. कोल्हापुरातही याच पद्धतीनं सर्वेक्षणाची आखणी केली आहे.

असं होणार सर्वेक्षण

1) पहिल्या टप्प्यात 100 लोकांचं सर्वेक्षण
2) कोल्हापूर शहरात पूर्वी कंटेटमेंट झोन असणाऱ्या, नंतर खुल्या केलेल्या परिसराची यासाठी निवड
3) शहरातून केली जाणार 500 व्यक्तींची निवड
4) इचलकरंजीतील 250 व्यक्तींची निवड होणार
5) करवीर तालुक्यातून निवडले जाणार 250 लोक
6) निवडलेल्या लोकांचे एक मिली रक्त घेतले जाणार
7) या रक्तातील प्रतिजैविके (आयजीजी अँटीबॉडीज) तपासणार
8) व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही हे तात्काळ कळणार
9) कोल्हापुरातील संसर्गाचा वेग, पुढील दिशा ठरवण्यास मदत होणार