सिनेमागृहातील खाद्यपदार्थाचे दर कमी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

पुणे शहरातील सिनेमागृहातील खाद्य पदार्थाचे दर सर्वाधिक आकारले जातात. त्याचा फटका सर्व सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो. त्यामुळे येत्या आठ दिवसात खाद्य पदार्थाचे दर कमी न केल्यास स्टाईलने आंदोलन केले जाणार आहे.अशी भूमिका माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगरसेवक किशोर शिंदे तसेच आजी माजी पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

यावेळी रुपाली पाटील म्हणाल्या की,मागील आठवड्यात पीव्हीआर या सिनेमा गृहात खाद्य पदार्थाच्या जादा दरा विरोधात आंदोलन करण्यात आले.त्यावेळी पीव्हीआर च्या व्यवस्थापकाकडून योग्य माहिती न दिल्याने मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात आले.त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व सिनेमागृह चालकांनी येत्या आठ दिवसात खाद्य पदार्थावरील दर कमी न केल्यास आणि बाहेरील खाद्यपदार्थ आत घेऊन परवानगी न दिल्यास मनसे स्टाईल पद्धतीने आंदोलन केले जाईल. असा इशारा सिनेमागृह चालकाना त्यांनी यावेळी दिला.