जिल्ह्यातील नागरिक संवेदनशील आणि जागरूक : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा

 सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाचवेळी आले होते. त्यावेळी विशेष अधिकार वापरून या सणांमध्ये नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पोलिस दलाने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांनी दोन्ही एकत्र आलेले सण गुण्यागोविंदाने साजरे केले. जिल्ह्यातील नागरिक संवेदनशील तर आहेतच शिवाय जागरूकही आहेत असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1797adff-cca0-11e8-8608-d77fbf09043d’]

जिल्हा पोलिस दलातर्फे उत्सव काळात नेमलेल्या विशेष पोलिस अधिकार्‍यांसह निवृत्त पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन अडचणीच्या काळात पोलिसांसोबत रहाण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीसह अन्य दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांसह गणेशोत्सव मंडळे, मोहरम मंडळे यांनी पोलिस प्रशासनाला चांगले सहकार्य केले. सर्वांनीच कायदा, सुव्यवस्था अबाधित राखत दोन्ही सण शांततेत पार पाडले. यापुढेही येणार्‍या सर्व सणांमध्ये नागरिक, निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे. सांगलीकरांच्या रक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडीन असेही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले.

[amazon_link asins=’B01MXY5BLM,B071ZRQZ2G,B00LEF7DOQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2757f737-cca0-11e8-93ab-e97834ee5b46′]

जयगोंड कोरे म्हणाले, विशेष पोलिस अधिकारी म्हणून निवड झाल्याचा कुटुंबियांना खूप आनंद झाला होता. पुढील उत्सवात पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात बसावे, आम्ही विशेष अधिकारी उत्सव शांततेत पार पाडू अशीही ग्वाही दिली. चिप्पलकट्टी म्हणाले, दिवसाचा बराच काळ वातानुकुलित कार्यालयात जात होता. गणेशोत्सवात पोलिसांसोबत विशेष अधिकारी म्हणून काम करताना जे समाधान मिळाले ते अवर्णनीय होते. फडके म्हणाले, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनाही विशेष अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. निवृत्तीनंतरही बंदोबस्तात सहभागी करून पोलिस दलाने आमच्यावर विश्‍वास दाखवला त्याला पुढेही पात्र राहू.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक विरकर, अनिकेत भारती, अमरसिंह निंबाळकर, किशोर काळे, शर्मिष्ठा वालावलकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यासह अधिकारी, नागरिक, निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) ‘त्या’ नऊ जणांची निर्दोष मुक्तता

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी…

पोलिस अधीक्षकांना उत्सव काळापुरते विशेष पोलिस अधिकारी नेमण्याचे अधिकार आहेत. अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करत यंदाच्या गणेशोत्सवात संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 534 विविध जाती-धर्मातील, व्यवसायातील नागरिकांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून निवड केली होती. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे नागरिकांना विशेष अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे गणेशोत्सवात दिसून आले.