पिंपरी-चिंचवड ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून घोषित, शहराच्या सीमा बंद

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी पिंपरी चिंचवड कंटेनमेंन्ट झोन म्हणून आज (रविवार) घोषीत केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज रात्री बारा ते 27 एप्रिल 2020 पर्यंत लागू असणार आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील 10 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच लगतच्या पुणे शहरात देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिक प्रसार स्टेज न राहता सामुदायिक प्रसार (कम्युनिटी) सुरु होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशातून कोरोना विषाणू प्रितबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलीस विभागाचे व राज्य आणि केंद्रीय विभागेचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना वगळण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा करणारी घाऊन वाहतूक या आदेशातून वगळण्यात आली आहे.

आदेशातील प्रमुख मुद्दे

पिंपरी-चिंचवड ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून घोषित, शहराच्या सीमा बंद

1.  या काळात बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवाव्यात. तसेच आपली एटीएम सेंटर सुरु ठेवावीत.

2.  या काळात सकाळी 10 ते 2 या कालावधीतच दूध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.

3.  या काळात मटण व चिकनची विक्री सकाळी 10 ते 2 यावेळेतच सुरु राहील.

4.  या काळात अत्यावश्यक व इतर सामान जसे अन्नधान्य, जवीनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री देखील सकाळी 10 ते 2 कालावधीतच सुरु राहिल.

5.  जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीत सुरु राहील. यासाठी मनपाच्या पासची आवश्यकता आहे.

6.  शहरातील सर्व हॉस्पीटल, दवाखाने व औषधांची दुकाने संपुर्ण वेळ सुरु राहतील.

7.  अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास 22 एप्रिल पर्य़ंतच लागू राहतील. यानंतर मनपा मार्फत नव्याने पास संबंधीत आस्थापनास बंधनकारक राहतील.

8.  शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पास मनपा मार्फत उपलब्ध करून दिले जाती.

9.  मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत विभागीय आयुक्त यांनी पारित केलेले आदेश कायम राहतील.