Cloudburst in Tamhini | ‘ताम्हिणी’त 24 तासात 486 मिमी पावसाची नोंद; पानशेत, टेमघर परिसरात मुसळधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cloudburst in Tamhini | कोकणाबरोबरच घाटमाथ्यावर गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy rain) झाली असून ताम्हिणी परिसरात (Cloudburst in Tamhini) गेल्या २४ तासात तब्बल ४८६ मिमी पाऊसाची नोंद येथे करण्यात आली आहे. यामुळे मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (​​Mulshi dam) गेल्या २४ तासात ऐतिहासिक अशा ७३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून धरणाची जलाशय पातळी एका दिवसात ७ फुटाने वाढली आहे.

ताम्हिणी, टेमघर, वरसगाव, पानशेत परिसरात या हंगामात प्रथम इतकी जोरदार वृष्टी झाली आहे. ताम्हिणीबरोबरच मुळशी धरणावर २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. टेमघर धरण क्षेत्रात २५० मिमी पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा ३० टक्के झाला आहे.

वरसगाव धरणात (Varasgaon dam) १५३ मिमी पाऊस झाला असून धरणात ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत परिसरात १५५ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा ५४ टक्क्याहून अधिक झाला आहे. खडकवासला परिसरात ३८ मिमी पाऊस पडला असून धरणातील पाणीसाठा ७२ टक्क्यांवर गेला आहे.

पवना धरण (Pavana Dam) परिसरात २३२ मिमी, वडिवळे धरणावर १९८, चासकमान धरणावर
६८, आंद्रा ७९, डिंभे १२९, वडज ३३, भामा आसखेड ५३, कळमोडी ९४, गुंजवणी ११५, निरा
देवधर २४९, भाटघर ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील चार
धरणातील पाणीसाठा १४.२४ टीएमसी इतका झाला असून तो ४८.८४ टक्के इतका आहे. एकाच दिवसात धरणांमधील पाणीसाठा २ टीएमसीने वाढला असून ६ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Suspension | ‘त्या’ चार वरिष्ठांवर कारवाई झाल्यानंतर ‘उत्पादन शुल्क’च्या 4 बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; आयुक्त कांतीलाल उमाप यांची कारवाई, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Cloudburst in Tamhini | 486 mm of rainfall recorded in 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update