home page top 1

राजर्षी शाहू महाराजांचे वंशजही भाजपामध्ये ! भाजपकडून विधानसभेचा पहिला उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातून ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी कागल मतदारसंघाचा पहिला उमेदवार निश्चित झाल्याचे संकेत कोल्हापूरमध्ये दिले आहेत. कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रणनिती आखल्याचे बोलले जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मुख्यमंत्र्यांनी काम करत राहण्यास सांगून त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी कोल्हापूर दौ-यावर होते. कागल कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजितसिंह घाटगे यांना काम करत राहण्याचा सल्ला दिला. तसेच तुम्हाला ज्या सभागृहात काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद नक्की देईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे घाटगे यांची विधानसभेसाठी उमेदवारी घोषीत केली असल्याची चर्चा सध्या कागलमध्ये रंगत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दारुण पराभव केला. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या रणनितीचा महायुतीला फायदा झाला. लोकसभेनंतर राज्यात विधानसभेची तयारी भाजपाने सुरु केली आहे. लोकसभेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवून भाजपाने राष्ट्रवादीला धक्का दिला. यानंतर भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त 

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे

Loading...
You might also like