राज ठाकरेंना ईडीने पाठविलेल्या नोटिशीबाबत मला काहीच माहित नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे जाहीर केले त्यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर याबाबत मला अजून काहीच माहित नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबत मी माध्यमांतून ऐकलं आहे. ईडी ही स्वतंत्र संस्था असून, तिचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. त्यामुळं या मुद्द्यावर मी काही बोलण्याचा प्रश्नच नाही असे देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. तसेच राज यांना नोटीस आली असेल तर त्यांनी उत्तर द्यायला हवं. काही चूक नसेल तर राज यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीची नोटीस आल्यावर मनसेसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. येत्या २२ तारखेला राज यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम विरोधात अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे मनसे नेत्यांनी म्हटले आहे.

राज यांना ईडीनं पाठवलेल्या नोटिशीबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यांना नोटीस कशासाठी पाठवली आहे हेच मला ठाऊक नाही. ईडी ही स्वतंत्र संस्था असून, तिचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले आहे. तसेच मनसेने २२ तारखेला ठाणे शहर बंडाची हाक दिली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.

आरोग्यविषयक वृत्त