मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार: फडणवीस

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून कायद्याच्या पातळीवर टिकेल असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

या बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे, उद्योजक बी.बी.ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत मराठा समाजाच्या लघु आणि दीर्घ उपाययोजनावर चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी आवाहन करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
[amazon_link asins=’B01D4EYNUG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f92d296-963f-11e8-921e-0105f2c62681′]
“या बैठकीसाठी 20 ते 22 मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाययोजना यावर चर्चा झाली. संयुक्त निवेदनाद्वारे म्हणणं मांडण्यात येणार आहे. मान्यवरांनी मोलाच्या सूचना दिल्या. तर आम्ही सरकारच्या योजना त्यांना सांगितल्या. निवदेनाद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहोत. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलं”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“सर्व विचारवंतांसोबत चर्चा केली, सूचनांच्या नोंदी घेतल्या. मराठा आंदोलन सुरु आहे, त्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं याबाबत चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये, आत्महत्या होऊ नये याबाबत आवाहन करण्यात आलं” अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.