CM Eknath Shinde | ‘वडील अन् पक्ष चोरायला निघाले’ ! उद्धव ठाकरेंचा टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला (BJP) शिवसेना संपवायची आहे. बंडखोरांना पक्षही चोरायचाय आणि माझे वडीलही चोरायला निघालात? ही कसली मर्दुमकी, कसली बंडखोरी? ही बंडखोरी नव्हे तर हरामीपणा आहे. तुम्ही दरोडेखोर आहात, हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Chief Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासातच उत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते ते आमच्या वडिलांसारखे होते. खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांच्या मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन रविवारी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी शक्तीप्रदर्शन करुन त्यांनी शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली होती. या टीकेवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर (Rangsharda Auditorium) पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी टीकेला उत्तर दिले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीती धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या संदर्भात केलेल्या टीकेला उत्तर दिले.

 

काय म्हणाले शिंदे?

वडील चोरण्याचं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे बंडखोरांसाठी वडिलांप्रमाणेच असल्याचे म्हटले.
मला या बाबतीत कोणावरही टीका करायची नाही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय.
त्या विचारांना आम्ही पुढे नेतोय हे महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं आहे.
त्यामुळेच आम्हाला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून येऊन लोक समर्थन देत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on shivsena chief uddhav thackeray
saying rebels trying to stole my father balasahebs legacy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा